आज होणार कुलभूषण जाधव यांची सुटका..? निकाल थोड्याच वेळात

Foto
नवी दिल्‍ली:   पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज निकाल देणार आहे. या प्रकरणावरील सुनावणी अंतिम टप्प्यात झाली असून निकाल भारताच्या बाजूने लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने  आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना  आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच, आपला निर्णय राखून ठेवला होता. आज आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निकाल देणार आहे, या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सुनावणीसाठी पाकिस्तानची कायदे विषयक टीम हेग येथे पोहचली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार पाकच्या कायदे विषयक टीमचे नेतृत्व ज्येष्ठ वकील मंसूर खान करत आहेत. त्याचसोबत टीमसोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसलदेखील उपस्थित आहेत. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेला पाकिस्तानकडून विरोध केला जाणार आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker